प्राचीन काळी वृत्रासुर नावाचा दैत्यराजा होऊन गेला. त्याने सर्व भूलोक जिंकून स्वर्गावर स्वारी केली. इंद्र, अग्नि, वरुण, यम वगैरेंना जिंकले या त्या ठिकाणी आपल्या असुरांची दिग्पाल म्हणून नेमणूक केली. व स्वर्गातील सर्वांना छळण्यास सुरुवात केली सर्व देवांनी एकत्र येऊन श्री ब्रह्मदेवाची, श्री विष्णुंची प्रार्थना करुन वृत्रासुराने अत्याचाराने केलेल्या दुरावस्थेची हकीगत त्यांच्या कानावर घातली.हे ऐकताच श्रीविष्णू कोपले. त्या रागाचे आवेशात त्यांचे तोंडातून अतिदिव्य तेज बाहेर आले हे पाहताच ब्रह्मदेव, इंद्र वगैरे देवांचे तोंडातून भयंकर तेजे बाहेर पडली. ही सर्व एकवरुन त्यापासून एक मोठा तेजगोला निर्माण झाला आणि त्यातून एक महादिव्य रुप धारण केलेली महादेवी प्रकट झाली आणि तिने महाभयंकर गर्जना केली. तिला पाहून सर्व देवांना ऋषींना अतीव आनंद झाला. त्यांनी आपापली अस्त्रे, चक्र, पाश, वज्र, शस्त्रे, अस्त्रे, आयुधे, वाहने इत्यादि (सिंह वगैरे) तिला अर्पण केली. या महादेवीची सर्व देवांनी स्तुती केली. ‘‘हे देवी, तू विश्वजननी आहेस. तूच सर्व शक्तींची अनेक रुपे, बुध्दि-सिध्दी, सर्व रुपिणी आहेस तू दुर्जय व दुर्गम्य आहेस म्हणूनच तू ‘दूर्गा’ या नावाने प्रख्यात होशील’’ अश्या रीतीने हा देवीचा अवतार होऊन ती दूर्गा झाली.
तिची गर्जना ऐकून वृत्रासुर तिला पाहण्यास आला तिला पाहून तो घाबरला, तरी पण तो तिच्यासोबत युध्द करु लागला. दोघांचे महाभयंकर युध्द झाले,शेवटी वृत्रासूर मारला गेला. सर्व देवदानवांची त्याच्या त्रासातून सुटका झाली. सर्वांनी देवीचा उदो उदो केला. नंतर ब्रह्मदेवांनी तिला विनविले की,‘हे देवी, तुला अजून अनेक कार्ये करावयाची आहेत. तरी तू हिमगिरी पर्वताच्या शतशृंग शिखरावर जाऊन वास्तव्य कर’ ते देवीने मान्य करुन तिथे वास्तव्य कर’ ते देवीने मान्य करुन तिथे वास्तव्य केले.
पुढे वृषवर्ण नावाच्या असुर राजाचा पुत्र महिषासुर हा महाबळी, पराक्रमी होता. त्याची राजधानी शोणितनगर होती. त्याने उग्र तप करुन ‘आपल्याला देव वा दानव कोणीही मारणार नाही’ असा वर मिळवला (पण त्यावेळी तो स्त्रीला विसरला) वर मिळाल्यावर उन्मत्त होऊन त्याने सर्व जगाला, देवांना त्रास देण्यास सुरुवात केली.शेवटी देवीने त्याच्याशी महाभयंकर युध्द करुन त्यालाही नाहीसे केले. देवांनी तिच्यावर पुष्पवृष्टी करुन आनंद व्यक्त केला. त्यानंतर पुन्हा सर्वत्र शांती नांदू लागली
पुढे सन १५०५ चे सुमारास पोर्तुगीजांनी लालसेने हा प्रंत जिंकून घेतला व ख्रिस्ती धर्माचे प्रचारासाठी हिंदू देवळे तोडणे, मूर्ती भंग करणे इत्यादी प्रकार सुरु झाले. म्हणून बिगणे गावाचे कामत वगैरे सारस्वतांनी पुढाकार घेऊन बिणगे येथे देवीची स्थापना केली. पुढे टिपू सुलतानाचे राज्य आले. त्यावेळी भीतीने लोकांनी ही देवी 'अरंभीला' तालुक्यातील बंदिगे गावी हलविली व तिची स्थापना करुन आज असलेले देऊन बांधले. त्यानंतर हे स्थान 'श्री आर्यादुर्गा अंकोला' म्हणून प्रिसध्द झाले.