आश्विन महिन्यात शुक्ल प्रतिपदेपासुन ते दशमी पर्यंत दहा दिवस हा उत्सव साजरा केला जातो. पहिल्या दिवशी सर्व देवतांची रुपे स्वच्छ करुन रुपे लावून सर्व देवता सजवले जातात. सर्व मंदिराची स्वच्छता करून रंगरंगोटी करून मंदिराची शोभा वाढविली जाते. नंतर षोडशोपचार पुजा होवून घटस्थापना केली जाते. संपूर्ण नवरात्र उत्सवा दरम्यान गावाच्या आजूबाजूच्या भागातील व महाराष्ट्रातून देवींच्या दर्शनासाठी हजारोच्या संख्येने भाविक मंदिरात येतात.
संपूर्ण उत्सवा दरम्यान सकाळी काकड आरती दुपारी देवीला नैवेद्य दाखवण्यात येते. दुपारी दर्शनासाठी आलेल्या भाविकांना महाप्रसादाची सोया संपूर्ण देवीहसोळ गावातर्फे करण्यात येते. सायंकाळी ७.३० ला मंदिरात महाआरती होते व त्यानंतर कीर्तनकार मार्फत पोती वाचण्याचा कार्यक्रम होतो.
संपूर्ण ९ दिवस रात्री मनोरंजनाचे अनेक संस्कृतीत कार्यक्रम जाकडी, नमन, नाटक, कलापथकाचा कार्यक्रमा इत्यादी कार्यक्रम होतात.
अष्टमीच्या दिवशी देवीचा होमहवन केले जाते. ह्या दिवशी ग्रामस्थ व भक्तगण मोठया संख्येने उपस्तिती राहता. नवमीच्या दिवशी कुमारिका पूजन करण्यात येते. ह्या दिवशी संपूर्ण ग्रामस्थ मंडळी संपूर्ण रात्र जागून देवीचा गजर केला जातो .दहाव्या दिवशी घट उठविले जातात.
अश्याप्रकारे नवरात्र उत्सव साजरा केला जातो.
