नवरात्री उत्सव
श्री आर्यादुर्गा मातेच्या भक्तांना/उपासकांना तसेच मातेच्या दर्शनास येणाऱ्या भाविकांना सुचित करण्यात येत आहे की, आपणास मंदिरामध्ये एकादशी/सप्तशती पाठ/नवचंडी होम/शतचंडी होम तसेच इतर मंगल कार्ये करावयाची असल्यास आपणास विद्यमान विश्वस्थ संस्थेची एक महिना पूर्व परवानगी घ्यावी लागेल. सदरहू कार्यक्रमास विश्वस्त संस्थेने ठरविलेली देणगी, आपणास कार्यक्रमा पुर्वी विश्वस्त संस्थेचे मंदिराचे व्यवस्थापक यांचेकडे देऊन रितसर देणगीची पावती घ्यावी लागेल. त्याचप्रमाणे वरिल कार्यक्रम मंदिराचे गुरुजी यांचे देखरिखे खाली करावे लागतील. त्यांची दक्षिणा वेगळी असेल.
कार्यक्रमासाठी देणगी पुढीलप्रमाणे :-
१) देवीला अभिषेक - १२५/-
२) एकादशी - १२५/-
३) सप्तशती पाठ - २५१/-
४) नवचंडी होम - ११२५/-
५) शतचंडी होम - २१२५ /-
टीप :- वरील देणगी ही एका दिवसाच्या कार्यक्रमासाठी असेल. एका दिवसापेक्षा जास्त दिवस कार्यक्रम करावयाचे असेल तर त्या प्रमाणात देणगी अदा करावी लागेल याची नोंद असावी.
हा निधी सदरहू मंदिराचा जिर्णोध्दार व मंदिराच्या भोवतालचा परिसर सुशोभित करण्यासाठी वापरला जाणार आहे. या देगणी व्यतिरिक्त आपणास या संकल्पनासाठी वेगळी देणगी द्यावयाची असल्यास स्विकारली जाईल.
वरिल कार्यक्रमा व्यतिरिक्त इतर मंगल कार्ये करावयाची असल्यास विश्वस्त संस्थेशी एक महिना अगोदर संपर्क साधुन कार्यक्रम करण्यास परवानगी घ्यावी लागेल.
विषेश सुचना - देवळातील परंपरागत वार्षिक कार्यक्रम तसेच विद्यमान विश्वस्त संस्थेने आयोजित केलेले कार्यक्रम ज्या ज्या दिवशी देवळात असतील त्या त्या दिवशी कोणाही भक्ताला तसेच संस्थेला देवळात कार्यक्रम करण्यास परवानगी मिळणार नाही याची नोंद घ्यावी.