आर्यादुर्गा देवी चरणी समर्पित
आई तु आई ग आहेस तु मंदिरी ।
जन धावत ग धावत येती तुझीया द्वारी ।
अंकोला गावी आपले मुळ रूप ठेवी ।
छाया घेउनी तु आलीस हसोळ गावी ।
वर्णु महिमा किती तुझा ग देवी ।
येत जत्रेचा क्षण बोलावितेस नवदुर्गादेवी ।
आनंदी आनंद होई ग देवीहसोळ गावी ।
जनसागर लोटतो ग लोटतो तुझ्या पायी ।
दोन दिवसानी निघते ग निघते तुझी ताई ।
आशीर्वाद ठेऊनी ग देवीहसोळ गावी ।
सुखी ठेव ग ठेव ग आम्हा तुझ्या पदरी ।
एवढे मागणे मागतो ग मागतो आम्ही गावकरी ।
वैशाली म. विचारे गणेश मंदिर वाडी .