ग्रामदेवता श्री. आर्यादुर्गा व श्री. जाकादेवी मंदिर विश्वस्त संस्था देवीहसोळ मार्फत मंदिराच्या परीसरात मातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांसाठी भक्त निवासस्थानाची सुविधा उपलब्ध केलीली आहे. भक्तनिवासा मध्ये मातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांना धार्मिक विधी आणि दर्शन कालावधीत वास्तव्य करता येऊ शकते. श्री. आर्यादुर्गा व श्री. जाकादेवी मंदिराचे भक्तनिवास हे निसर्गाच्या सौंदर्याने नटलेल्या आणि अतिशय शांत अशा मंदिराच्या परीसरात बांधलेले आहे. भक्तनिवासा मध्ये वास्तव्यासाठी येणाऱ्या भक्तांच्या सोयीसाठी उत्तम रूम्स आणि २४ तास गरम पाण्याची व्यवस्था केलेली आहे. तसेच येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी उत्तम नाष्टा , चहा, आणि जेवणाची सोय केली जाते. भक्त निवासाची बुकिंग ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने केली जाईल.
सूचना :-
१) भक्त निवासा मध्ये कमाल दोन दिवस वास्तव्य करू शकतो.
२) नाष्टा, चहा, आणि जेवणाच्या सोईकरता पूर्व कल्पना द्यावी. ( खाली दिलेल्या क्र. संपर्क साधावा )
व्यवस्थापक संपर्क :- महेंद्र विचारे
मोबाईल क्र +९१ ९४०४१५१८८३
३) श्री. आर्यादुर्गा व श्री. जाकादेवी मंदिराचे भक्तनिवास हे मंदिराच्या परीसरात असून येणाऱ्या भक्त गणांनी मंदिराचं पावित्र्य राखावे ही विनंती.
४) भक्तनिवासा मध्ये मद्यपान आणि धुम्रपान करण्यास सक्त मनाई आहे.
५) श्री. आर्यादुर्गा व श्री. जाकादेवी जत्रा उत्सव व नवरात्र उत्सवा दरम्यान ऑनलाईन रूम बुकिंग सुविधा उपलब्ध नसणार याची भाविकांनी नोंद घावी.